विमा पॉलिसीच्या नावाने वृध्दाची 27 लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

पुणे : हप्ता न भरल्याने बंद पडलेली विमा पॉलिसी सुरु करून देत असल्याचे बहाण्याने व पॉलिसीची मुदत संपल्यामुळे मिळवारी मोठी रक्कम तुम्हाला मिळतील असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीला दिल्ली येथे पुणे सायबर टीमकडून अटक करण्यात आली. त्याने एका ज्येष्ठ नागरिकांची 27 लाख रुपयांची फसवणूक केली होती. शामबाबू किशोरीलाल (रा. बी-399, मोतीनगर सुदर्शन पार्क , नवी दिल्ली यास डाबरी ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी पेठ येथे राहणाऱ्या एका निवृत्त ज्येष्ठ नागरीकाने 2016 ते 2018 या कालावधीसाठी वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसी घेतल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांनी विम्याचे हप्ते भरले नाहीत. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून तुमच्या विमा पॉलिसी बंद पडल्या असून त्या तुम्हाला पुन्हा चालू करता येतील, असे खोटे सांगितले. त्यासाठी नवीन पॉलिसी घ्याव्या लागतील. याबरोबरच तुमच्या एका विमा पॉलिसीची मुदत संपली असल्याने तुम्हाला 83 लाख रुपयांची रक्कम मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले. मात्र हे पैसे भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर द्यावे लागतील असे सांगून त्यांचा विश्‍वास मिळविला. त्यानंतर वेगवेगळ्या बँकखात्यांवर तब्बल 27 लाख रुपयांची रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने ही रक्कम भरली. त्यानंतर फिर्यादीने त्यांना पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. 

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली. या प्रकाराबाबत सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचे तांत्रिक विश्‍लेषण केले. त्यामध्ये शामबाबू किशोरीलाल यांच्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील डाबरी येथे शुक्रवारी सापळा रचून त्यास अटक केली. 

एक मोबाईल फोन , सीम कार्ड जप्त करण्यात आले. त्यास दिल्लीतील द्वारका न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक मच्छिंद्र पंडित, सहायक पोलीस निरिक्षक गंगाधर घावटे, पोलीस कर्मचारी राजकुमार जाबा, दिपीका मोहीते, बाबासाहेब कराळे, शाहरूख शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested in delhi for 27 lakh fraud with senior citizen of pune in the name of insurance policy

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: