esakal | खराबवाडीत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai crime

खराबवाडीत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाकण :खराबवाडी, वाघजाईनगर ता,खेड गावच्या हद्दीत एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर एका तरुणाने बलात्कार केला. याप्रकरणी पिडीतीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन आरोपी मोहम्मद हनिफ फकीर( वय-२०, सध्या, रा.खराबवडी,ता,खेड,मूळ रा.कानपूर, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली.

खेड न्यायालयाने त्याला येत्या १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे अशी माहिती महाळुंगे चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी आज दिली. हा प्रकार मागील महिन्यात ता,१९ ला दुपारी बाराच्या सुमारास खराबवाडी,वाघजाईनगर गावच्या हद्दीत एका पायवाटेजवळील झाडा झुडपात घडला.

हेही वाचा: Podcast : वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालाल तर...ते सोलापुरी चादरीचा फॅशनेबल शर्ट

पीडित तरुणी पायी तिच्या मैत्रीणी कडे चालली होती. यावेळी तिच्या बरोबर कंपनीत काम करत असलेल्या तरुणाने मला तुझ्याशी काही बोलायचे आहे असे सांगून तिला बाजूला नेले व तिच्यावर बलात्कार केला.

loading image
go to top