

Arrested
नारायणगाव - कांदळी (ता. जुन्नर) येथील श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्रात कार्यक्रमाची बारी लावण्याच्या कारणावरून गोळीबार करून फरार झालेल्या चार आरोपी पैकी शिवशंकर मारुती हळदेकर (वय-28 वर्षे, राहणार मेदनकरवाडी, चाकण) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने खेड येथून ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी त्याला नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.