बीडमध्ये शिक्षकाचा भरदिवसा खून करणाऱ्या आरोपीस पुण्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

बीडमध्ये पुर्ववैमनस्यातून एका शिक्षकाचा भर दिवसा खुन करुन पुण्याला पळून आलेल्या आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आरोपीस बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अमर अकबर शेख (वय 30, रा. बालेपीर, बीड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सय्यद साजीद अली असे खुन झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पुणे : बीडमध्ये पुर्ववैमनस्यातून एका शिक्षकाचा भर दिवसा खुन करुन पुण्याला पळून आलेल्या आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आरोपीस बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अमर अकबर शेख (वय 30, रा. बालेपीर, बीड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सय्यद साजीद अली असे खुन झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अली हे बीडमधील सैनिकी विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. अमर शेख व सय्यद जलील यांच्या काही कारणावरुन भांडणे होती. त्याच रागातून शेख व त्याच्या साथीदाराने सय्यद यांचा भर दिवसा चाकुने वार करुन खून केला होता. खुनाच्या या घटनेनंतर बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. 

खुनाच्या घटनेनंतर अमर शेख हा पुण्याला पळून आला होता. तो हडपसरमधील सय्यदनगर येथे वास्तव्य करीत होता. दरम्यान, बीडमधील शिक्षकाच्या खून प्रकरण्तील आरोपी सय्यदनगरमध्ये असून त्याच्या पायाला जखम झाली आहे, तो आता रेल्वेगेटजवळून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. अशी खबर हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नितीन मुंढे व शाहीद शेख यांना मिळाली.

पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्यास अटक करुन बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संबंधीत आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बीडमधील पोलिस ठाण्यात सात ठिकाणी तसेच तो एका टोळीचा सदस्यही आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested in pune for murdering teacher in Beed