Pune Rains : कारसह वाहून गेलेल्या तिघांपैकी दुसरा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुणे : एनडीआरएफच्या पथकास आज सकाळी जांभुळवाडी येथे एक मृतदेह आढळला. गणेश शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोलेवाडी येथे नाल्यामध्ये बुडालेल्या व्हॅगनर कारमधील तिघांपैकी हा मृतदेह असण्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली आहे.
 
पुण्यात झालेल्या मुसळाधार पावसामुळे ओढ्यांना पुर आल्याने रस्ते जलमय झाले होते.   दरम्यान पाण्याच्या प्रवाहात तीन जणांसह कार वाहुन गेली होते. त्यापैकी संदीप वाडकर याचा मृतदेह सापडला होता, तर दोघेजण बेपत्ता होते. त्यापैकी शिंदे असण्याची शक्यता आहे. निखिल चव्हाण यांचा अद्याप शोध लागला नसून पथकाकडून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one Dead body found at jambulwadi at pune rains

टॅग्स