दोन कारचा अपघात. एक ठार दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

वाघोली : नगरकडे जाणाऱ्या नॅनो कारने दुभाजक ओलांडून पुण्याकडे जाणाऱ्या कारला धडक दिल्याने नॅनो कार चालक ठार झाला तर इतर दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील पुष्कर हॉटेल समोर घडली.

आदित्य दयानंद पाटील ( वय 20, रा वाघोली) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. तर दुसऱ्या कार मधील नंदू गव्हाणे (वय 30, रा शिरूर) व भाऊ पवार (वय 34, रा. शिरूर) हे जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅनो कार नगरच्या दिशेने जात होती तर दुसरी कार पुण्याकडे जात होती.

शस्त्रक्रियेदरम्यान विवाहितेचा मृत्यू, रुग्णालयात गोंधळ

पुष्कर हॉटेल समोर नॅनो कार दुभाजक ओलांडून पुण्याकडे जाणाऱ्या कार वर आदळली. यामध्ये नॅनो मधील चालक बाहेर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. तेथे उपस्थित नागरिकांनी सर्वांना रुग्णालयात हलविले. पाटील यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर जखमी पवार व गव्हाणे यांच्यावर वाघोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात नॅनो कारचा चक्काचुर झाला. या अपघाताचा काही काळ पुणे नगर महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला.

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ ​

कमी उंचीचे दुभाजक ठरतायत जीवघेणे
पुणे नगर महामार्गावर अत्यंत कमी उंचीचे दुभाजक आहेत. अशा प्रकारे या पूर्वीही अपघात झाले आहेत. त्यावरील लाईट कट बँरीकर तुटलेले आहेत. या मुळे रात्रीच्या वेळी दुभाजकाला धडकून अपघात घडतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in car accident at Nagar pune road vagholi pune