esakal | दुखणं अंगावर काढणं पडलं महागात; वडगाव येथील एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

दुखणं अंगावर काढणं पडलं महागात; वडगाव येथील एकाचा मृत्यू

किरकोळ दुखणं अंगावर काढणं वडगाव निंबाळकर येथील जयप्रकाश बाबुराव राऊत वय 67 यांच्या जीवावर बेतलं कोरोना टेस्ट करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

दुखणं अंगावर काढणं पडलं महागात; वडगाव येथील एकाचा मृत्यू

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर : किरकोळ दुखणं अंगावर काढणं वडगाव निंबाळकर येथील जयप्रकाश बाबुराव राऊत वय 67 यांच्या जीवावर बेतलं कोरोना टेस्ट करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या तीन-चार दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता, यामुळे गावातील डॉक्टरांना दाखवून उपचार केले दुसऱ्यांदा पुन्हा दाखवले असता कोरोना टेस्ट करून घ्यावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

पुढील उपचारासाठी बारामती येथील खाजगी दवाखान्यात त्यांना नेले असता येथेसुद्धा टेस्ट करून घेण्याचे सल्ला दिला. कोरोनाची धास्ती घेतलेल्या राऊत यांनी उद्या येऊ असे म्हणून घरी घेऊन येण्याचा आग्रह मुलगा जीवन यांच्याकडे धरला. रात्री घरी येऊन विश्रांती घेतली. सकाळी अचानक त्रास अधिक वाढू लागला. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

कोरोनामुळे गावातील सात जणांचा मृत्यू झाला. यामुळे करोनाची धास्ती लोकांनी इतकी घेतली आहे की आजारी पडले तरी गावातल्या डॉक्टरकडे औषधोपचार केले जात आहेत. कोरोना टेस्ट करण्याबाबत नागरीकांमधून गैरसमज झाले आहेत. ग्रामस्थांच्या मध्ये विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)