esakal | पुणे : रस्त्यावर उभे राहून गप्पा मारणे एकाच्या जीवावर बेतले; दोघे जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

 truck hit two wheeler on the road at pune

रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुला मोटारसायकल उभी करुन आपआपसात गप्पा मारणे तीन मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील माळी मळा येथे रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल उभी करुन, गप्पा मारत असताना भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली.

पुणे : रस्त्यावर उभे राहून गप्पा मारणे एकाच्या जीवावर बेतले; दोघे जखमी

sakal_logo
By
सकाळ वृृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुला मोटारसायकल उभी करुन आपआपसात गप्पा मारणे तीन मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील माळी मळा येथे रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल उभी करुन, गप्पा मारत असताना भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात एक तेवीस वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर त्याच्यासोबत गप्पा मारणारे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता. 2) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास माळीमळा येथील स्वाद हॉटेलसमोर झाला आहे. 

आनंद विश्वास काळभोर (वय 23, रा. लोणी काळभोर ता. हवेली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदचे मित्र विशाल दिलीप काळभोर (वय- 35) व ऋषिकेश विठ्ठल काळभोर (वय- 34, रा. दोघेही रा. लोणी काळभोर) हे दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींच्यावर कदमवाकवस्ती येथील खाजगी रूग्णालयात उपचार चालु असुन, दोघांचीही प्रकृती ठिक असल्याची माहीती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे. 


लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद काळभोर ऋषिकेश काळभोर व विशाल काळभोर हे तिघेही लोणी काळभोर गावातील समता समाज तरुण मंडळाचे सदस्य आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना व पुजा केल्यानंतर वरील तिघेही जेवण्यासाठी मोटारसायकलवरुन माळी मळा परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवण उरकून परत येत असताना, स्वाद हॉटेलमोर रस्त्याच्या बाजुला मोटारसायकल उभी करून, आनंद, विशास व ऋुषिकेश हे तीघेजण गप्पा मारत उभे होते. आनंद मोटारसायकलवर बसला होता. तर उर्वरीत दोघेजण मोटारसायकल जवळ उभे राहुन आनंदशी गप्पा मारत होते. त्याचवेळी सोलापूर बाजूकडून आलेल्या एका भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वर बसलेला आनंद काळभोर गंभीर जखमी झाला तर, मोटरसायकल शेजारी उभे राहून आनंद बरोबर गप्पा मारणारे, विशाल व ऋषिकेश किरकोळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच माळीमळा परिसरातील नागरिकांनी तीनही जखमींना त्वरीत कदमवाकवस्ती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आनंद काळभोर याचा मृत्यू झाला. तर विशाल व ऋषिकेश या दोघांच्यावर उपचार चालु आहेत. 

loading image
go to top