esakal | पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक
sakal

बोलून बातमी शोधा

One hundred victims of corona in Pune

पुणे शहरात ९ मार्चला पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यानंतर त्यांच्या संख्येत सतत वाढ होत राहिला. त्यादरम्यान म्हणजे, ३० मार्चला कोरोनाने पहिला बळी घेतला आणि तेव्हापासून नव्या रुग्णांपाठोपाठ मृतांच्या संख्येतही भर पडत गेली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयातील रुग्णांचा बळी गेला. गंभीर बाब म्हणजे, १५ दिवसांपूर्वी एकाच दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात पसरलेल्या कोरोना गेल्या ३३ दिवसांत शंभर जणांचा जीव घेतला आहे. अर्थात, रोज सरासरी तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक पुणे शहरातील ९१ मृतांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील पाच आणि ग्रामीण भागातील चार रुग्ण मरण पावले आहेत. कोरोनाच्या मृत्यांच्या आकड्याने शंभरी गाठल्याने पुन्हा भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या साऱ्या मृत रुग्णांना कोरोना सह अन्य आजारही होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात ९ मार्चला पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यानंतर त्यांच्या संख्येत सतत वाढ होत राहिला. त्यादरम्यान म्हणजे, ३० मार्चला कोरोनाने पहिला बळी घेतला आणि तेव्हापासून नव्या रुग्णांपाठोपाठ मृतांच्या संख्येतही भर पडत गेली. पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्हयातील रुग्णांचा बळी गेला. गंभीर बाब म्हणजे, १५ दिवसांपूर्वी एकाच दिवसांत १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. सुरवातील मृतांमध्ये ५५ ते ६० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचा समावेश होता. परंतु, एके दिवशी पर्वतीतील २७ वर्षाच्या तरुणालाचाही बळी गेल्याने घबराट पसरली. त्यानंतर ३७ आणि ३८ वर्षाच्या पुरुषांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या ३३ दिवसांत २७ ते शंभर वर्षाच्या आजीबाईंचा मृत्यू झाला. पुण्यातील मृतांमध्ये सर्वाधिक संख्या भवाना पेठ, येरवडा, कोंढवा, पर्वतीतील आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे शहरात शुक्रवारी रात्रीपर्यंत १ हजार ६११ रुग्णांची नोंद आहे. मात्र त्यातील सव्वातीनशे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. तर शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजघडीला विविध रुग्णालयांत १ हजार १९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील सुमारे ९ हजार ८८९ जणांची तपासणी केली असता; त्यापैकी ८ हजार ३९६ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, १ हजार ६११ जण कोरोनाबाधित होते. त्यापैकी ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजघडीला १ हजार १९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

loading image
go to top