राम मंदिरासाठी पुण्यातून पाठविली चांदीची एक किलोची वीट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

आयोध्यामध्ये 5 ऑगस्टला राम मंदिर उभारणीची सुरुवात करणार आहेत. राम मंदिर उभारणीसाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर व स्व. माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या समरणार्थ नवीन सिंग परिवाराच्या वतीने एक किलो चांदीची वीट पाठविण्यात आली.

वडगाव शेरी : आयोध्यामध्ये 5 ऑगस्टला राम मंदिर उभारणीची सुरुवात करणार आहेत. राम मंदिर उभारणीसाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर व स्व. माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या समरणार्थ नवीन सिंग परिवाराच्या वतीने एक किलो चांदीची वीट पाठविण्यात आली.

यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष संतोष खांदवे, मोहनराव शिंदे-सरकार, बाळासाहेब थोरवे, मिलिंद गायकवाड, प्रेम राय, विनीत वाजपेयी, नितीन खरात, मुकेश जाधव, अतुल जाधव,  यासह मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, प्रभू रामचंद्राचे मंदिर उभारणी आयोध्या मध्ये होतेय ही आनंदाची गोष्ट आहे. पुणे शहर भाजप व  नवीन सिंग च्या वतीने एक किलो चांदीची भेट देण्यात आली. सर्वांनी 5 ऑगस्ट रोजी आपल्या घरा समोर गुढी उभारावी व आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन जगदीश मुळीक यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One kg of silver brick sent from Pune for Ram temple