Vishal Kale
sakal
शिरूर - शिरूर-चौफुला मार्गावरील करडे घाटात चार ते पाच जणांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यु झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी प्रथम आपल्याकडील मोटारीने समोरच्या मोटारीला ठोकर दिली व त्यातील एकाला मोटारीबाहेर खेचून त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्या आणि निपचीत पडल्यानंतरही डोक्यात दगड घातले. इतरांवर दगडफेक केली. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या थरारक प्रसंगाने परीसरात खळबळ उडाली.