पुण्यात भरदिवसा पाठलग करत धारदार शस्त्राने वार करून तरुणांचा खुन 

One killed in attack with a sharp weapon at pune
One killed in attack with a sharp weapon at pune

पुणे : पुर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून दोन तरुणांवर काही जणांनी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी पालघनाने वार करुन एकाचा खुन केला. तर या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम रस्त्याव शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. बिबवेवाडी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. 

स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची केशर ही लवकरच मिळणार

सलीम मेहबुब शेख (वय 24) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर तौफीक शेख (वय 27) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सलीम शेख व संशयित आरोपी कचरावत यांची एकमेकांशी ओळख होती. पुर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून कचरावत व त्याचे साथीदार बिबवेवाडीतील गंगाधाम रस्ता परिसरात आले. त्यावेळी सलीम व तौफीक शेख हे दोघेजण तेथे थांबले होते. त्याने दोघांना शिवीगाळ करीत सलीम शेख याच्यावर पालघनाने वार केले. तर सलीमचा मित्र तौफीक याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी तेथून पळून गेले.

स्थानिक नागरीकांनी सलीम व तौफीक या दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र सलीमला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारांपुर्वीच मृत्यु झाला. तर तौफीक हा देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही वेळातच कचरावतला ताब्यात घेतले. 
पदाची झूल बाजूला सारून एकनाथ शिंदेंनी रुजवली मायभूमीत स्ट्रॉबेरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com