Ambegaon News : पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन
Paush Purnima : पौष पौर्णिमेनिमित्त नागापूर येथील श्रीक्षेत्र थापलिंगमध्ये खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एक लाख भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले.
निरगुडसर : सदानंदाचा येळकोट हा जयघोष करत एक लाख भाविकांनी पहिल्या दिवशी खंडोबा देवाचे दर्शन घेतले.पौष पौर्णिमेनिमित्त नागापूर(ता.आंबेगाव )येथील श्रीक्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला सोमवार (ता.१३) उत्साहात प्रारंभ झाला.