

Uruli Kanchan Accident
sakal
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पिओ (गाडी क्र.एम.एच.४२-बीएस -३८५५) चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात आज शुक्रवारी (ता.२३) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये चारचाकी स्कॉर्पिओचा चेंदामेंदा झाला आहे.गौरख त्र्यंबक माने (रा.कंधर,ता.करमाळा, जि.सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.समाधान अंकुश बाबर (वय २५, धंदा केळी व्यवसाय,रा. कुगाव,ता.करमाळा,जि.सोलापूर),विजय सूर्यकांत माने (रा.कंधर,ता.करमाळा, जि.सोलापूर) व अलिकेश खान (रा.बिहार) असे अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.