
- प्रकाश शेलार, खुटबाव
१९८६मध्ये गारपीटग्रस्त कानगाव (ता. दौंड) येथील धोतर-पायजाम्यातील अल्पशिक्षित व निरक्षर १५० शेतकऱ्यांना तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी फक्त एका फोनवर थेट कुवेत, दुबई व सौदी अरेबिया या आखाती देशांमध्ये कामगार म्हणून नोकरी मिळवून दिली. शरद पवार यांचा हा बहुआयामी निर्णय कानगावला आर्थिक सुबत्ता मिळवून देणारा ठरला. या निर्णयामुळे कानगावमध्ये एक प्रकारे हरितक्रांती आली, असेच म्हणावे लागेल.