Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

पावसात ठप्प महाराष्ट्र, पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर सरकार’ला सुप्रिया सुळे यांचा सवाल – १२ वर्षांच्या कारभाराचा हिशेब कोण देणार?
MP Supriya Sule

She demanded transparency in the Mumbai-Pune Missing Link project and questioned the government's performance over the last twelve years.

sakal

Updated on

पुणे : " राज्यात मोठमोठे प्रकल्प करताना सरकारने पर्यावरणाचा अजिबात विचार केलेला नाही. परिणामी, अवघ्या एका पावसात संपूर्ण महाराष्ट्र ठप्प झाल्याची स्थिती आहे. राज्यात अधिवेशन सुरू असताना अशी स्थिती निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. नेहमीच ७० वर्षांचा हिशेब मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या मागील १२ वर्षातील कामाचा हिशेब कोण देणार ? ' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com