सोसायट्यांसाठी ‘वन स्टॉप सर्व्हिस’

संकेत नेरकर व परेश कोतकर यांचा स्टार्टअप; देखभाल दुरुस्तीचे काम सोपी
pune
punesakal

पुणे : सोसायटीचे कोणतेही देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असेल, तर त्यासाठी योग्य व्यक्ती शोधणे हे पदाधिकाऱ्यांचे नियमितचे कामकाज. त्यासाठी त्यांना प्रत्येकवेळी विविध व्यक्तींकडे चौकशी करावी लागते. मिळालेला कारागीर नीट काम करेल की नाही? त्याने चांगले काम केले नाही तर काय? ही भीती त्यांच्या मनात कायम असते. त्यांची ही गैरसोय ‘इन्स्पॅको’ (inspacco) या स्टार्टअपने दूर केली आहे.

pune
धक्कादायक! आर्थिक कारणातून पतीने केला पत्नीचा खून

सुरक्षारक्षक, हाऊसकिपींग, गार्डनिंग, खाते व्यवस्थापन, सीसीटीव्ही, लिफ्ट, जनरेटर, फॅब्रिकेशन, बांधकामाशी संबंधित कामे, वॉटरप्रूफिंग, बर्ड नेटिंग, अशा पन्नासहून अधिक सेवा पुरविणारे प्लॅटफॉर्म या स्टार्टअपने निर्माण केले आहे. संकेत नेरकर आणि परेश कोतकर यांनी २०१९ मध्ये शहरात या स्टार्टअपची सुरुवात केली. नेरकर हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी आहे. त्यांनी पूर्वी मास्टरकार्डसह फायकॉमर्स आणि पोर्टिया मेडिकल कंपन्यांसाठी काम केले आहे. तर कोतकर हे आयआयएम इंदूरचे विद्यार्थी आहे. त्यांनी पूर्वी इंडियामार्ट आणि पेयु कंपन्यांसाठी काम केले आहे.

सोसायटीचे कामकाज पाहत असलेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा पूर्णवेळ त्याच कामासाठी देणे बऱ्याचदा शक्य नसते. त्यामुळे जेव्हा केव्हा देखभाल दुरुस्तीची वेळ येते तेव्हा सर्वांची ती काम करून देण्याऱ्या योग्य व्यक्तीचा शोध घेण्याची पळापळ सुरू होते. ‘इन्स्पॅको’ने हीच गरज लक्षात घेत एक संकल्पना निर्माण केली व ती प्रत्यक्षात उतरवली. त्यासाठी ‘इन्स्पॅको’ने ‘क्लाऊड’ आधारित सेवा पूर्तता प्लॅटफॉर्म तयार केला आहे.

pune
गरुडझेप शिवज्योत मोहीम पुण्यात दाखल

याबाबत नेरकर व कोतकर यांनी सांगितले की, विकत किंवा भाडेतत्त्वाने कोणी घर घेत असेल, तर त्यातील वीज आणि पाण्यासह विविध बाबी तपासून त्याचा रिपोर्ट तयार करणे, अशी कंपनीची सुरुवात झाली. त्यावेळी सोसायटींना आवश्‍यक असलेल्या सेवेबाबत समजले. त्यातून या प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली.

सोसायटीत राहत असलेल्या नागरिकांना त्यांच्या इमारतीची किंवा स्वतःच्या सदनिकेच्या देखभाली वेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्वांचे जीवन सुखकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे स्टार्टअप त्याच दृष्टीने कामकाज करीत आहेत. -संकेत नेरकर, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, इन्स्पॅको

मार्केटमधील कामगारांना आम्ही प्लॅटफार्मच्या माध्यमातून सोसायटीला कनेक्ट करतो. सोसायट्यांना व्यावसायिक सेवा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. शहरातून शंभरहून अधिक सोसायट्यांना आम्ही सेवा पुरवत आहोत.-परेश कोतकर, इन्स्पॅको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com