DCm Sunetra Pawar
sakal
पुणे - ‘जिल्ह्यातील ३०३ जिल्हा परिषद शाळांचा कायापालट झाल्यानंतर आता ही मोहीम विस्तारली जाणार असून, पुढील काळात आणखी एक हजार शाळांना ‘मॉडेल स्कूल’ करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शासनाकडून आवश्यक पाठबळ दिले जाईल,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. तसेच तरुण पिढीला फारसे काही समजावून सांगावे लागत नाही. या हुशार पिढीची स्वतःची मतप्रणाली तयार झाली आहे. त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे,’ असेही त्यांनी शनिवारी सांगितले.