पुणे झोनमध्ये निरंकारी मिशनतर्फे १०,३०० रोपांची लागवड

पुणे झोनमध्ये निरंकारी मिशनतर्फे
१०,३०० रोपांची लागवड
Published on

आळंदी, ता. २५ : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी पुणे झोनअंतर्गत पिंपळगाव-खडकी, भवरापूर, कोरेगाव-मूळ, खुटबाव आणि पाषाण सुतारवाडी या पाच ठिकाणी या वर्षी एकूण १०,३०० रोपांची लागवड करण्यात आली. या वर्षी पिंपळगाव-खडकी ग्रामपंचायत, सेक्टर-आळेफाटा या ठिकाणाचा नवीन ‘वननेस वन’ स्थळ म्हणून समावेश करण्यात आला. येथे सुमारे १,५२,४६० चौरस फूट क्षेत्रामध्ये ५,००० रोपांची लागवड करण्यात आली.

‘वननेस वन-निसर्गासोबत समरसता’ या अभियानाच्या सहाव्या टप्प्याचे आयोजन आज देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील ६५० ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले. या अभियानात मिशनचे लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवकांनी पूर्ण समर्पित भावनेने सहभाग घेत सुमारे साडेपाच लाख रोपांची लागवड केली.
रोप लागवडीसोबतच पुणे झोनमध्ये मागील वर्षांमध्ये लावलेल्या ४२,७८५ वृक्षांचे संवर्धन व देखभाल करण्याचे कार्यही सेवादारांकडून केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्व ठिकाणी लावलेल्या रोपांची १०० टक्के जिवंतता कायम राहिली आहे. ही नियमित देखभाल, वृक्षसंवर्धन आणि समर्पित सेवेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत ६५० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादार पूर्ण समर्पित भावनेने या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत. या मोहिमेमुळे स्थानिक जैवविविधता समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com