doctor
doctorsakal media

Baramati News : होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक वर्ष मुदतीचा सर्टिफिकेट कोर्स बारामतीत सुरू

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा अभ्यासक्रम बारामतीत सुरू करण्यास मान्यता दिली असून यंदाच्या वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

बारामती - होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी एक वर्ष मुदतीचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फर्मकोलॉजी हा अभ्यासक्रम बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हा अभ्यासक्रम बारामतीत सुरू करण्यास मान्यता दिली असून यंदाच्या वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.

राज्यातील ग्रामीण आरोग्यव्यवस्था प्रामुख्याने आयुष डॉक्टरांवर अवलंबून असताना होमिओपॅथिक डॉक्टरांना अगदी आपत्कालीन परिस्थितीत ही आधुनिक चिकित्सा पध्दतीची औषधे वापरण्यात अनेक कायदेशीर अडथळे येत असत.

ग्रामीण आणि दुर्गम भागात लोकांनाही अडचणी येत असत. हे अडथळे दूर करण्याकरिता होमिओपॅथिक संघटना 1980 पासून देत असलेल्या लढ्याला यश येत नव्हते. सन 2012 मधे डॉ. बाहुबली शहा महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर होमिओपॅथी परिषदेच्या मार्गदर्शिका डॉ. रजनी इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले होते.

त्यांनी या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक व कायदेशीर बाजू तपासून योग्य प्रस्ताव सादर केल्यास मंत्रिमंडळस्तरावर मान्यता घेण्याची ग्वाही दिली होती.

त्याप्रमाणे तत्कालीन वैद्यकिय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डॉ. बाहुबली शहा यांनी त्यार केलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा केला. अजित पवार यांच्या प्रबळ राजकीय इच्छा शक्तीच्या जोरावरच महाराष्ट्र वैद्यक परिषद अधिनियम तसेच महाराष्ट्र होमिओपॅथी प्रॅक्टिशनर अधिनियमध्ये दुरुस्ती करणारी विधेयके महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर झाली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने राज्यातील विविध शासकीय व अशासकीय महाविद्यालयातील कायदेशीर अडचणी दूर झाल्या, आरोग्य सेवेचा दर्जा ही सुधारला.

हा कोर्स सुरू करण्याकरिता महाविद्यालयाचे अधिष्ठाता याना भेटून कोर्स सुरू करण्याचे निवेदन बारामती होमिओपॅथी संघटनेचे डॉ नंदकुमार झांबरे, डॉ. शिरकांदे, डॉ. राकेश मेहता यांनी दिले होते.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के, उप अधिष्ठाता डॉ. अंजली शेटे फर्माकलॉजी विभाग प्रमुख डॉ. हिरे, प्रा. डॉ. रामा भोसले यांनी प्रयत्न करून युदधपातळीवर प्रस्ताव तयार केला. त्याला यश आल्याने बारामतीत हा अभ्यासक्रम सुरू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com