esakal | वाघोलीत पहिला कोरोना रुग्ण सापडण्याला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात 4470 रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोलीत पहिला कोरोना रुग्ण सापडण्याला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात 4470 रुग्णांची भर

वाघोलीत पहिला कोरोना रुग्ण सापडण्याला एक वर्ष पूर्ण; वर्षभरात 4470 रुग्णांची भर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

वाघोली : वाघोलीत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात 4470 रुग्णांची भर पडली. म्हणजे महिन्याला सरासरी 375 रुग्ण आढळून आले. यावर्षी एप्रिलच्या पंधरवड्यात रुग्णांची खूपच झपाट्याने वाढ झाली. दोन लाखांच्या पुढे लोकसंख्या, शहरालगतचे गाव तरीही कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यात यश आले. वर्षभरात गरजुंच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. 15 एप्रिल 2020 रोजी वाघोलीतील गोरे वस्ती परिसरात हा रुग्ण आढळून आला. त्यानंतर हळू हळू रुग्ण वाढीस सुरुवात झाली. रुग्ण वाढीचा हा आकडा पाहून वाघोलीकरानी काळजी घेण्यास सुरुवात केली. गावात अनेक वेळा जनता करफुही लागू करण्यात आला. गृहकुल सोसायटी स्थरावरही काळजी घेण्यात आली. मे जूनच्या काळात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. वाघोलीतही रुग्ण वाढले. गर्दी होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचयत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी कंबर कसून काम केले. लॉकडाउनच्या काळात अगदी मोफत धान्य व जेवणही पुरविण्यात आले. मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपल्या राज्यात जाण्याआठी वाघलीत जमत होते. त्यांना खाद्य पदार्थ पुरविण्यापासून त्यांची जाण्याची व्यवस्था करण्यासाठी पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते झटले. यानंतर ही लाट ओसरली अन काही प्रमाणात जनजीवन सर्वसामान्य झाले. सध्या पूर्व हवेलीतील गावात वाघोलीची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असली तरीही लसीकरण मोहिमेत अग्रस्थानी आहे. बंद झालेले कोव्हिडं केअर सेन्टर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमही जोरदार सुरू आहे.

हेही वाचा: पुण्यात पीएमपी धावणार; कोणाकोणाला मिळणार प्रवेश, वाचा

वाघोलीतील नागरिकांनी चांगली साथ दिली. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने व शहरालगत गाव असूनही स्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. मधल्या काळात नागरिकांचा हलगर्जी पणा झाला. मात्र आता अधिकची काळजी घेण्याची गरज असून लसीकरण ही करून घ्यावे.

- डॉ वर्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली

मी प्रशासनाच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून सर्व प्रकारची मदत देण्याचा प्रयत्न करीत आहे. आता नागरिकांची साथ गरजेची आहे. कोरोना पासून दूर राहण्यासाठी दिलेले नियम पळाले पाहिजे. लसीकरणही लवकर करून घ्यावे.

- ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषद सदस्य

कोरोना स्थिती नियंत्रणात राहण्यासाठी ग्रामपंचायत सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. कोरोना गेला असे नागरिकांनी समजू नये. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

- वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली

वाघोलीतील स्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी नियम काटेकोर पणे पाळले पाहिजे. लस आली आता कोरोना संपला असा गैरसमज करून घेऊ नये. खूपच गरज असली तरच घराबाहेर पडावे. काळजी घेणे हीच सध्या लस आहे.

- प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे

वाघोलीतील स्थिती

 • वर्षभरात एकूण कोरोना रुग्ण -- 4470

 • बरे झालेले रुग्ण -- 4163

 • मृत्यू -- 35

 • सध्या ऍक्टिव्ह रुग्ण -- 272

 • बरे होण्याची टक्केवारी -- 93 टक्के

 • मृत्यू प्रमाण -- 0. 83 टक्के

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थिती -- ( 5 गावांचा समावेश )

 • वर्षभरात एकूण कोरोना रुग्ण -- 6175

 • बरे झालेले रुग्ण -- 5671

 • मृत्यू -- 67

 • सध्या ऍक्टिव्ह रुग्ण -- 488

 • बरे होण्याची टक्केवारी -- 92 टक्के

 • मृत्यू प्रमाण -- 1.08 टक्के

 • 15 एप्रिल 2021 पर्यंत झालेले लसीकरण -- 11475