

Farmer Deepak Maruti Bhor from Khadki (Ambegaon) has brought onions stored in his onion storage shed to the market for sale.
Sakal
निरगुडसर : गेले तीन वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा तोट्यात विकला,उत्पादन खर्चही वसूल झाला नाही अनेकांनी कांदा पिकावर नांगर फिरवला परंतु सध्या कांद्याला प्रति किलो ३५ ते ४० रुपये बाजार भाव मिळत असले तरी दर टिकून राहणे महत्वाचे आहे यातून मागील तीन वर्षाचा तोटा तरी भरून निघेल यामुळेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.