बराकीतला कांदा सडल्याने शेतकरी अडचणीत

बराकीतला कांदा सडल्याने शेतकरी अडचणीत

Published on

आळेफाटा, ता. ३ ः आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून, बराकीत ठेवलेला कांदा सडू लागल्याने उर्वरित राहिलेला कांदा शेतकरी मिळेल त्या भावात विकू लागला आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा, वडगाव आनंद, आळे, संतवाडी, कोळवाडी, राजुरी, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, भोरवाडी या गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक घेत असतात. गेल्यावर्षी कांद्याचे बियाणे महाग असून, देखील शेतकऱ्यांनी या पिकावर खर्च केला आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला रोगराईचे प्रमाण वाढल्याने, ती पिके जळू लागली आहे.
कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने कांदा बराकीत साठवून ठेवला होता. परंतु, या पिकाला गेल्या आठ महिन्यांपासून चांगला भाव मिळाला नाही. त्यातच बराकीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला आहे. काही शेतकऱ्यांच्या बराकीत असलेल्या कांद्याला मोड आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, आळेफाटा येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारात मंगळवारी (ता. ३) एक नंबर सुपर गोळा कांद्यास १० किलोस १७० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. एक नंबर १० किलोस कांद्यास १५० ते १७० रुपये बाजारभाव मिळाला‌‌. दोन नंबर १० किलोस कांद्यास १३० ते १५०, तीन नंबर १० किलोस कांद्यास ११० ते १३०, तर चिंगळी दहा किलोस कांद्यास ३० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com