

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर
ठोस धोरण आखावे ः सुळे
ॲग्रोवन वृत्तसेवा
निफाड, जि. नाशिक ः ‘‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या हितासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने ठोस आणि दीर्घकालीन धोरण आखावे,’’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वनाधिपती विनायकदादा पाटील प्रतिष्ठानचा प्रारंभ शनिवारी (ता. २९) खासदार सुळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या वेळी त्या बोलत होत्या.
सुळे म्हणाल्या, ‘‘नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे ठोस धोरण नाही. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत असेल, तर सरकारला त्यात काय हरकत आहे? रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होतो; मग शेतकऱ्यांसाठी का नाही?’’
नाशिकचे खासदार भास्कर भगरे कांद्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करीत आहेत. आमदार दिलीप बनकर यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे. राजकारण होत राहील, मतभेदही असतील; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. हाच विनायकदादांना खरा सन्मान ठरेल, असे आवाहन सुळे यांनी केले.
या वेळी ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार गोकुळ गीते, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी आमदार संजय चव्हाण, सहकार नेते रमेशचंद्र घुगे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, रयत शिक्षण संस्थेचे विश्वस्त ॲड. भगीरथ शिंदे, ‘मविप्र’चे माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, वैकुंठ पाटील, अनिल कुंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.