मंचरमधील बाजार समितीत कांद्यास उच्चांकी बाजारभाव

मंचरमधील बाजार समितीत कांद्यास उच्चांकी बाजारभाव
Published on

मंचर, ता. २५ : येथील (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) १६ हजार ५०० पिशव्यांची कांद्याची आवक झाली. बाहेरील राज्यांमधून मागणी वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला.

बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला दहा किलोसाठी ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
दरम्यान, बाहेरील राज्यांत कांद्याची मागणी वाढल्याने आणि स्थानिक बाजारात आवक घटल्याने बाजारभावात तेजी आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांद्याचे बाजारभाव समाधानकारक मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात आवक आणि मागणीच्या परिस्थितीनुसार बाजारभावात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

कांद्याचे दहा किलोचे बाजारभाव (रुपयांत) : सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा : २८० ते ३००, सुपर गोळा कांदा १ नंबर : २५० ते २८०, सुपर मीडियम २ नंबर कांदा : २०० ते २५०, गोल्टी व गोल्टा कांदा : १३० ते २००, बदला व चिंगळी कांदा : ७० ते १२०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com