esakal | मोदी सरकारने अखेर शेतकऱ्यांना रडवलेच
sakal

बोलून बातमी शोधा

chakan onion

मुंबई येथील कांदा निर्यातदार कंपनीचे सतीश बाईसकर यांनी सांगितले की, निर्यात बंदीमुळे शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील हंगामात कांद्याला भाव अधिक मिळेल याची शक्‍यता नाही.

मोदी सरकारने अखेर शेतकऱ्यांना रडवलेच

sakal_logo
By
हरिदास कड

चाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात बुधवारी 1600 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला प्रती किलोला 15 ते 25 रुपये भाव मिळाला. केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे हा भाव आजच्या बाजारात पाच ते दहा रुपये किलोला उतरला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील काळात कांद्याला मंदी येईल व किलोला अगदी पाच ते दहा रुपये कसाबसा भाव मिळेल, असा अंदाज व्यापारी राम गोरे, माणिक गोरे, संपत पानसरे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव खाली आले. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांनी या धोरणाचा निषेध केला. राज्यात चाकण बाजारात निर्यातीसाठी उन्हाळी, हिवाळी, तसेच वखारीत साठविलेल्या कांद्याला मुंबई, दिल्ली येथील निर्यातदार कंपन्या, व्यापारी यांची मोठी मागणी असते. सध्या चाकण बाजारात साठवणुकीचा कांदा विक्रीसाठी येत आहे. नवीन काढणी केलेला कांदा डिसेंबर ते मे या कालावधीत येतो, त्यावेळी अगदी पन्नास हजार क्विंटल कांद्याची आवक दर दिवशी होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. लॉकडाउनच्या काळात कांद्याला प्रतिकिलोला तीन ते पाच रुपये भाव मिळत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने नाफेडच्या वतीने चाकणला कांदा खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दहा ते बारा रुपये किलोला भाव मिळाला. केंद्र सरकारने निर्यात बंदी मागे घ्यावी, अशी मागणी केली असल्याचे
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले.

भाव दोन, तीन, पाच रुपयांवर येईल 
मुंबई येथील कांदा निर्यातदार कंपनीचे सतीश बाईसकर यांनी सांगितले की, निर्यात बंदीमुळे शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील हंगामात कांद्याला भाव अधिक मिळेल याची शक्‍यता नाही. निर्यात बंदीमुळे मुंबई बंदरात चारशे कंटेनर अडकले आहेत. त्यांची निर्यात रोखली आहे. त्यामुळे भाव गडगडतील. पुढील काळात कांद्याला किलोला अगदी दोन, तीन, पाच रुपये भाव मिळेल.     

निर्यातबंदीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त होईल. आताच कोठे भाव वाढले होते. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. या निर्णयाने शेतकरी चिंतातूर झाला आहे. 
- हनुमंत गाडे, कांदा उत्पादक 
 

loading image
go to top