manchar market committee onion rate hike
sakal
मंचर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली असून, बाहेरील राज्यांमधून मागणी वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २५) बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो ३० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. गेल्या आठवड्यात प्रती किलो २४ ते २५ रुपये बाजारभाव होता.