अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा.लि.युनिट ५ कारखान्याचा गाळप हंगामाची सांगता
AKK26B05926
तडवळ (ता. अक्कलकोट) : येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट क्रमांक पाच कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील, जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड व इतर.
........
ओंकार कारखान्याच्या
ऊस गाळप हंगामाची सांगता
.........
अक्कलकोट, ता. ४ : तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट ५ या साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता करण्यात आली आहे. या गळीत हंगामात साखर कारखाने ६. ८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले असून १०. ८६ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे.
कारखान्याचा गाळप हंगाम २०२५-२६ च्या सांगता समारंभाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास साखर कारखान्याचे संचालक ओमराजे बाबूराव बोत्रेपाटील हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा हंगामाचा सांगता समारंभ पार पडला. ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात कारखान्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ४.४२ कोटी युनिट वीजनिर्मिती करण्यात आली असून त्यापैकी २. ८० कोटी युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही. एम. गायकवाड यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

