esakal | Pune : सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सैन्‍यदलाच्या अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय सैन्यदलात लघू आयोगा अंतर्गत (एसएससी) अधिकारी पदासाठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया अविवाहित महिला व पुरुष उमेदवारांसह शहिदांच्या पत्नींसाठी असून येत्या २७ ऑक्टोबरपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

ही प्रवेश प्रक्रिया तांत्रिक विभागासाठी असून यामध्ये महिला व पुरुष उमेदवारांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तर वीर पत्नींसाठी वयोमर्यादा ३५ वर्ष ठेवण्यात आली आहे.

यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखती उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना सैन्यदलात अधिकारी म्हणून निवडण्यात येणार आहे. यामध्ये रिक्त पदांची संख्या १९१ असून महिलांसाठी १४, पुरुषांसाठी १७५ तर २ पदे वीर पत्नींसाठी आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रतेशी संबंधित काही विशिष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी किंवा या प्रक्रिये संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

loading image
go to top