‘ऑनलाइन क्‍लास’द्वारे कोट्यवधींची उलाढाल

मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी एप्रिलपासूनच ऑनलाइन वर्गांची तयारी सुरू केली आहे. नामांकित क्‍लासेसबरोबरच घरगुती शिकवणी वर्ग चालविणारेही ऑनलाइन आले आहेत. त्यामुळे जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. 

पुणे - कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. यात आता ऑनलाइन खासगी क्‍लासेसचीही भर पडली आहे. दिवसेंदिवस ऑनलाइन क्‍लासेसचा शोध वाढत असून, या खासगी आणि व्यावसायिक शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

खासगी शिकवणी घेणाऱ्यांनी एप्रिलपासूनच ऑनलाइन वर्गांची तयारी सुरू केली आहे. नामांकित क्‍लासेसबरोबरच घरगुती शिकवणी वर्ग चालविणारेही ऑनलाइन आले आहेत. त्यामुळे जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई अशा अन्य मंडळाचे अभ्यासक्रमही ऑनलाइन शिकविले जातात. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाची फी अधिक आहे. मात्र, क्‍लासेसच्या फी वर कोणाचेही नियंत्रण नसल्याने पालकांचे आर्थिक गणित जुळविताना कंबरडे मोडत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

माझ्या मुलाचे यंदा दहावीचे वर्ष आहे. शाळेमार्फत ऑनलाइन वर्ग दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाले; परंतु शाळेच्या वर्गात एका वेळी ४०-५० विद्यार्थी असतात. मात्र, ऑनलाइन खासगी व्यावसायिक क्‍लासेसमध्ये मर्यादित विद्यार्थी असल्याने प्रत्येकाकडे लक्ष दिले जाते. मात्र, खासगी क्‍लासेसमुळे खिसा रिकामा होतो.
- अंकुश पवार, पालक

कोरोनामुळे आम्ही एप्रिलपासूनच पहिल्यांदाच ऑनलाइन क्‍लास सुरू केला आहे. एका बॅचमध्ये १५ ते १६ विद्यार्थी असतात. त्यामुळे प्रत्येकाकडे लक्ष देणे शक्‍य होते. यासाठी आम्ही झूम ॲपचा वापर करत आहोत.
- हेमा शिंदे, व्यावसायिक क्‍लासचालक

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील क्‍लासेसची स्थिती
    ऑनलाइन खासगी क्‍लासेस : हजारापेक्षा जास्त
    घरगुती क्‍लासेस ः हे ही आले ‘ऑनलाइन’
    क्‍लासची फी : तीन ते नऊ हजार रुपये (प्रत्येक विषय)
    वर्षाची फी : १५ ते ८० हजार. (काही ठिकाणी जास्त)
    प्रत्येक बॅचमधील विद्यार्थी संख्या : १० ते २०
    कोणत्या ॲपचा वापर ः झूम, वेबिनार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online class turnover worth millions

टॅग्स
टॉपिकस