महत्त्वाची बातमी : UPSC, MPSC ट्रेनिंग सेंटरची परीक्षा पुणे विद्यापीठाने पुढे ढकलली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी कोचिंग प्रोग्रॅम राबविण्यात येते. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील 'यूपीएससी' आणि 'एमपीएससी' प्रशिक्षण वर्गात प्रवेशाची ऑनलाइन प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता ५ डिसेंबर रोजी होणार आहे. 

'कोसळलेल्या आभाळावर पाय देऊन उभे रहा, महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे!'

विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी कोचिंग प्रोग्रॅम राबविण्यात येतो. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. ही प्रवेश परीक्षा २४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा ५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत होणार आहे. 

ऑनलाइन परीक्षेसाठी सेंटर, बैठकव्यवस्थेची माहिती आणि हाॅल तिकीट २३ नोव्हेंबरला उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online entrance exam of Savitribai Phule Pune University Competitive Exam Center has been postponed