

दोन जिल्ह्यांत ऑनलाइन
खत बुकिंग प्रणालीत मोठा बदल
---------
प्रति हेक्टरी युरिया पाच, तर डीएपी दोन गोणी मिळणार
--------- किंवा---------
दोन जिल्ह्यांत बेसुमार
खत खरेदीला आळा
---------
युरिया, डीएपीच्या ऑनलाइन बुकिंगवर मर्यादा
---------
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आता युरिया व डीएपीची बेसुमार ऑनलाइन बुकिंग करता येणार नाही. केंद्र शासनाने आता बुकिंग करताना कमाल मर्यादा लागू केली आहे.
पाच जूनपासून दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय खते विक्री कार्यपद्धत (एनएफएसएफ) लागू करण्यात आली. त्यामुळे या जिल्ह्यांमधील ऑफलाइन खत विक्री पूर्णतः बंद झाली आहे. शेतकरी आता थेट आपापल्या मोबाइलमधील ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ नावाचे अॅपमधून खतांचे बुकिंग करीत खरेदी करीत आहेत.
अॅप सुरू होताच अनेक गावांमधून संशयास्पदपणे जादा खतांचे बुकिंग होऊ लागले. काही गावांमधून एकाच वेळी प्रतिशेतकरी ५० पेक्षा जास्त गोण्यांचे बुकिंग होऊ लागले. यामुळे अनावश्यक खतांची खरेदी होऊ लागली व दुसऱ्या बाजूला इतर गरजू शेतकऱ्यांना बुकिंगसाठी खते शिल्लक नसल्याचे निदर्शनास येऊ लागले. त्यामुळे बुकिंगवर मर्यादा आणावी, अशी मागणी खत विक्रेत्यांकडून होऊ लागली. त्यामुळे कृषी विभागाच्या सूचनेनुसार केंद्राने अॅपमध्ये दुरुस्ती करीत बुकिंगवर मर्यादा आणली आहे.
बेसुमार खत खरेदीला आळा घालून खतांचा गैरवापर व काळाबाजार थांबेल, असे कृषी अधिकाऱ्यांना वाटते. दरम्यान, कृषी सचिव परिमल सिंह यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन जिल्ह्यांमधील खत विक्रेत्यांना एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणाली (आयएफएमएस) एकापेक्षा अधिक मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी केवळ एका उपकरणातून शेतकऱ्याला आलेला क्यूआर कोड स्कॅन करीत खत विकता येत होते. त्यामुळे गर्दी झाल्यानंतर खतविक्रीत गैरसोय होते, अशी तक्रार विक्रेते करीत होते. आता केंद्राने विक्रेत्याला आयएफएमएस प्रणालीचे डेस्टटॉप ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. तसेच, एकाचवेळी पाच मोबाइलशी ही प्रणाली जोडून खत विक्री करण्याची सुविधा दिली आहे.
चौकट ----
७५ हजार शेतकऱ्यांनी केली खरेदी
छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन खत बुकिंग प्रणाली रुजू लागल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये १.३६ लाख शेतकऱ्यांनी खतांचे बुकिंग केले. त्यातील ७५ हजार शेतकऱ्यांनी ३० हजार टन खतांची प्रत्यक्ष खरेदी केली. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातील ऑनलाइन खत बुकिंगचा आकडा मोठा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.