ऑनलाइन रोजगार मेळावा 28 आणि 29 ऑक्‍टोबरला 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

या मेळाव्यात उद्योजकांमार्फत रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत.ऑनलाइन मेळाव्यात उद्योजकांनी ऑनलाइन पद्धतीने त्याच्याकडील रिक्तपदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसूचित केलेली आहेत.

पुणे - खासगी क्षेत्रातील कारखान्यांमध्ये नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पुणे कार्यालयामार्फत 28 आणि 29 ऑक्‍टोबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या मेळाव्यात उद्योजकांमार्फत रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. ऑनलाइन मेळाव्यात विविध उद्योजकांनी ऑनलाइन पद्धतीने त्याच्याकडील रिक्तपदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसूचित केलेली आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योजकांमार्फत उमेदवारांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हिडिओ कॉन्फरन्स या माध्यमाद्वारे किंवा प्रत्यक्ष घेऊन विविध पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर उमेदवारांकरीता नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या महास्वयम वेबपार्टलवर नोंदणी आणि लॉग इन करून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जाऊन ONLINE DIVISIONAL JOB FAIR PUNE DIVISION निवडावे. शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करावा. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त श. बा.अंगणे यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online job fair on 28th and 29th October