ऑनलाइन खरेदी करताय, सावधान!

शिवानी खोरगडे
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे - नववर्षाच्या निमित्ताने ऑनलाइन शॉपिंग साइट्‌सवर सवलतींचा अक्षरशः वर्षाव झाल्याचे चित्र दिसेल. साहजिकच आपल्याला आवडतील त्या वस्तू झटपट खरेदी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. पण थांबा, ऑनलाइन खरेदी करताना संबंधित वेबसाईट खरी आहे का? आपण फसवले तर जाऊ शकत नाही ना ! याची खात्री करा, कारण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑनलाइन खरेदी करताना फसवणूक झालेल्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याची नोंद सायबर पोलिसांकडे झाली आहे.

पुणे - नववर्षाच्या निमित्ताने ऑनलाइन शॉपिंग साइट्‌सवर सवलतींचा अक्षरशः वर्षाव झाल्याचे चित्र दिसेल. साहजिकच आपल्याला आवडतील त्या वस्तू झटपट खरेदी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. पण थांबा, ऑनलाइन खरेदी करताना संबंधित वेबसाईट खरी आहे का? आपण फसवले तर जाऊ शकत नाही ना ! याची खात्री करा, कारण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑनलाइन खरेदी करताना फसवणूक झालेल्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याची नोंद सायबर पोलिसांकडे झाली आहे.

ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत वेबसाईटवर खरेदी न केल्यामुळे किंवा त्याची पडताळणी न केल्यामुळे फसवणुकीची शक्‍यता असते. 
मागील काही दिवसांत या स्वरुपाच्या असंख्य तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. २०१७ मध्ये २६८ ऑनलाईन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याच्या घटनांची नोंद सायबर पोलिसांकडे झाली आहे. तर २०१८ मध्ये फसवणूक होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढून ५३५ वर पोचली आहे. 

या तीन प्रकारे अधिक होते ऑनलाईन खरेदी-विक्रीत फसवणूक 
(सायबर क्राइम सेलकडे नोंद झालेल्या खऱ्या घटनांवर आधारीत उदाहरणे) -
वस्तूचा फोटो, व्हिडीओ ऑनलाईन खरेदी साईटवर अपलोड केला जातो. पण संपूर्ण पत्ता, फोन क्रमांक न देता केवळ मेसेज स्वरुपात बोलण्यासाठी म्हणून संपर्क क्रमांक दिला जातो. ‘वस्तूच्या किंमतीच्या अर्धी किंमत आधी आणि उर्वरीत रक्कम वस्तू हाती आल्यानंतर भरा’ असे मेसेजद्वारे सांगितले जाते. अर्धी रक्कम भरल्यानंतर समोरून आपला संपर्क क्रमांक ब्लॉक केला जातो. 

वस्तू विक्री संदर्भातही ऑनलाईन साईटवरून फसवणुकीचे प्रकार घडतात. तुम्हाला विकायच्या असलेल्या वस्तूचे मालक जरी तुम्ही असलात तरी ती वस्तू दुसराच कुणीतरी आपल्या मालकीची दर्शवून तिसऱ्याला विकून फसवणूक करतो. तुमच्या वस्तूचा केवळ ते फोटो घेऊन दुसराच कुणी स्वतःचा संपर्क क्रमांक देऊन साईटवर डिस्प्ले करतो, तुमच्या वस्तूचा आर्थिक व्यवहार करतो आणि निम्मे किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले की संपर्क क्रमांक बंद करून ठेवतो.
 
ऑनलाईन साईट्‌सवर लोक आपल्या वस्तू भाडेतत्वावर उपलब्ध आहेत, म्हणून जाहिरात करतात. तुमची वस्तू भाड्‌याने घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क करून, वस्तूचे भाडे देऊन समोरची व्यक्ती वस्तू घेऊन जाते, ती परत देतच नाही. 

ऑनलाइन साईट्‌सवर वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू किंवा गिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवणूक होते. मुळात संबंधित व्यक्ती पैसे आधी का मागत आहे?, वस्तूचा मालक कुठे राहतो? या सगळ्याची खात्रीशीर माहिती मिळविल्याशिवाय व्यवहार करू नका. आमच्या स्तरावर आम्ही अशा काही नामांकित साईट्‌सच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या साईटवरून झालेल्या फसवणुकीच्या घटना कशा रोखता येईल, याबाबत मार्गदर्शन करत आहोत.  
- राधिका फडके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम सेल

Web Title: Online Purchasing Cheating Alert Crime