कचरावेचकांची मुले शिष्यवृत्तीपासून वंचित

कचरावेचकांची मुले शिष्यवृत्तीपासून वंचित
Published on

पुणे, ता. ८ : ‘‘स्वयं अर्थसहाय्यित (सेल्फ फायनान्स) शाळांमध्ये शिकणाऱ्या कचरावेचक व सफाई क्षेत्रातील कामगारांच्या पात्र मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज करता येत नसल्याने ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. ही तांत्रिक अडचण तातडीने दूर करून अर्जाची सुविधा सुरू करावी, या मागणीसाठी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीच्या वतीने १२ ऑगस्टला समाजकल्याण आयुक्तालय येथे विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती पंचायतीचे सरचिटणीस योगेश मंजुळा यांनी दिली.
मंजुळा म्हणाले, ‘‘सफाई क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या मुलांना दरवर्षी ३ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, सेल्फ फायनान्स शाळांना वैध ‘युडायस’ कोड असूनही या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नसल्याने हजारो मुले याला मुकली आहेत. या प्रश्नावर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. १७ जुलैला आयुक्तांनी पंधरा दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मध्यस्थीनंतरही प्रणालीत बदल झाला नाही. शिष्यवृत्तीअभावी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना शाळांचे शुल्क भरणे कठीण झाले असून, मुलांचे शैक्षणिक नुकसान व गळती होण्याची भीती निर्माण झाली आहे.’’ त्यामुळे शाळांच्या प्रकारावरून भेदभाव न करता ऑनलाइन अर्ज सुविधा तातडीने सुरू करावी आणि २०२३-२४ पासूनची थकीत शिष्यवृत्ती द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Teacher nitin Shejwal
MahaDBT
The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
Sports Scholarship Returns in Pune; Athletes to Receive Financial Support Again
30 English Keywords
Marathi News Esakal
www.esakal.com