ॲानलाइन शूज खरेदी पडली दोन लाखांना | Cyber Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime
ॲानलाइन शूज खरेदी पडली दोन लाखांना

ॲानलाइन शूज खरेदी पडली दोन लाखांना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ॲानलाइन शूज खरेदी करने एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. शूज खरेदी करणाऱ्या महिलेने एका ॲपरून शूज खरेदी केले. त्याचा कन्पर्मेशन कोड न आल्याने ॲपच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रावर संपर्क केला. त्यावेळी सायबर चोरट्याने महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून व ओटीपीच्या आधारे त्यांच्या खात्यातून एक लाख ८१ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत २३ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात राहतात. त्यांनी सात जुलै रोजी एका ॲानलाइन खरेदी ॲपव्दारे शूज खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांना शूज खरेदीबाबतचा कन्पर्मेशन कोड ॲपवरून मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित ॲपच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रात संपर्क साधला.

ग्राहक तक्रार निवारण केंद्रातील संपर्क क्रमांक बदलून चोरट्याने त्याचा मोबाईल क्रमांक तेथे टाकला होता. महिलेने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्याने महिलेकडील बँकेची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने गोपनीय माहितीचा गैरवापर करून त्यांना एक ओटीपी पाठवला. तो ओटीपी फिर्यादी यांनी पाठविल्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे लांबविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक समाधान मचाले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

loading image
go to top