
पुणे : शहरात सायबर चोरट्यांकडून दररोज कुणाला तरी मोबाइलवर संदेश येतो आणि त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे होते. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ६६ वर्षीय नागरिकाला १३ लाखांना गंडविण्यात आले. ऑनलाइन टास्क, डिजिटल अरेस्ट अशा सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असून, दररोज नागरिकांची लाखोंची फसवणूक होत आहे. परंतु प्रशिक्षित आणि पुरेशा मनुष्यबळाअभावी अनेक गुन्ह्यांचा तपास शेवटपर्यंत पोहोचत नाही. पुण्यासाठी पाच सायबर पोलिस ठाण्यांचा प्रस्तावही गृह विभागाकडे प्रलंबित आहे.