ऑफलाईनच शाळा हवी; ऑनलाईन नकोच.

कोरोनाचा कहर कमी झाला अन 8 ते 12 वी शाळा सुरू झाल्या.
 school
schoolSakal

वाघोली : कोणी साकारला स्मार्ट कचरा डस्ट बिन प्रकल्प, कोणी साकारला मोबाइल वरील ब्लूटूथ वर नियंत्रण होणारी कार, कोणी साकारला वीज वाचवणारा प्रकल्प. इतकेच नव्हे तर रांगोळी, चित्र यांच्या माध्यमातून कोरोनाची जनजागृती ही मुलांनी केली. निमित्त होते विज्ञान, रांगोळी व चित्रकला प्रदर्शनाचे. वाघोलीतील विष्णुजी शेकूजी सातव विद्यालयात. दोन वर्षानंतर मुलांना आपल्यातील कल्पकता दाखविण्याची संधी यामुळे मिळाली. अन आपोआपच सर्वांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले ऑफलाईनच शाळा हवी. ऑनलाईन नकोच.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सातव विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वृक्षारोपंण, वाढ झालेल्या वृक्षांचा वाढदिवस, विज्ञान, रांगोळी, चित्रकला व हस्तकला प्रदर्शन या कार्यक्रमांचा समावेश होता. दोन वर्षे मुलांना कोरोना मुळे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. यामुळे त्यांना आपल्यातील कल्पकता दाखविण्याची संधीच मिळाली नाही. कोरोनाचा कहर कमी झाला अन 8 ते 12 वी शाळा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांची कल्पकता पुन्हा एकदा संधीची वाट पाहू लागली. ती मिळताच त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली.

चित्रकला प्रदर्शनात मुलांनी अनेक निसर्ग चित्रे रेखाटली. शरद पवार यांच्या हुबेहूब छटाही रेखाटल्या. रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी कोरोवर जनजागृती केली. कोरोना योध्यांच्या प्रती रांगोळीतून कृतज्ञता व्यक्त केली. हस्तकला प्रदर्शनात टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ डेकोरेटिव्ह वस्तू बनविल्या. तर विज्ञान प्रदर्शनात विविध विषयांवरील प्रकल्प साकारले. यामध्ये स्मार्ट कचरा डस्ट बिन प्रकल्प, मोबाइल वरील ब्लूटूथ वर नियंत्रण होणारी कार, वीज वाचवणारा प्रकल्प. आदींचा समावेश होता. उपस्थित पाहुण्यांकडून या कलेचे भरभरून कौतुक झाल्यानंतर मुलांचे चेहरेही आनंदाने उजळून निघाले. या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, माजी सरपंच रामदास दाभाडे, शिवदास उबाळे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, बाळासाहेब सातव, वैज्ञानिक डॉ शशिकांत वाडेकर, एन के निंबाळकर, मुख्यध्यापक ए टी कळमकर, शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थितत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com