पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून (ता. ३१) होणाऱ्या विश्व मराठी संमेलनात पुस्तक आदान-प्रदानचा आगळावेगळा उपक्रम होणार आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत आपल्याकडील जुने पुस्तक देऊन नवे पुस्तक घेण्याची संधी वाचकांना मिळणार आहे.