esakal | पुणे : आता 'शुभमंगल सावधान' म्हणा 20 लोकांमध्येच!
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding

लग्नासाठी 50 जणांना परवानगी असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने यापुढे लग्न केवळ वीस जणांमध्येच आटोपावे लागणार आहे.

पुणे : आता 'शुभमंगल सावधान' म्हणा 20 लोकांमध्येच!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : लग्नासाठी 50 जणांना परवानगी असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने यापुढे लग्न केवळ वीस जणांमध्येच आटोपावे लागणार आहे. 'अनलॉक'च्या नव्या नियमात महापालिकेने ही तरतूद केली असून, त्याची आजपासून अंमलबजावणी सुरू होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऐन लग्नाच्या सीझनमध्ये लॉकडाऊन आल्याने अनेकांचे विवाह पुढे ढकलण्यात आले. मात्र, ज्यांच्या तारखा निश्चित झाल्या होत्या, त्यांच्यासाठी राज्य सरकारने वधू पक्षाकडील पंचवीस आणि वर पक्षाकडील पंचवीस अशी 50 जणांना लग्नासाठी परवानगी दिली होती. 13 जुलैला जेव्हा पुन्हा लॉकडाऊन सुरु झाले, त्यावेळी पूर्व नियोजित लग्नांना वीस लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली होती. मात्र, या काळातील विवाहांची संख्या नगण्य होती. लाॅकडाउन उठल्यानंतर पुन्हा पन्नास लोकांची लोकांच्या उपस्थितीची परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पन्नास लोकांची परवानगी घेऊन शंभर ते पाचशे लोकांपर्यंत लग्नाला गर्दी होऊ होऊ लागल्याची उदाहरणे समोर आली. त्यातून काही ठिकाणी संसर्ग झाल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे यापुढे लग्न समारंभासाठी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीलाच परवानगी देण्यात आली आहे. अत्यंत मोजक्या लोकांमध्येच विवाह पार पाडावा लागणार असल्याने वधू- वर हिरमुसले असले तरी अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुढच्या महिन्यात लग्न असणाऱ्या वधूचे पिता एम. बी. जाधव म्हणाले, "या निमित्ताने लग्नाच्या अनावश्यक खर्चाला आणि बडेजावाला आळा बसला आहे, ही चांगली गोष्ट आहे. यातून सर्वांनीच योग्य तो धडा घ्यायला हवा. लग्नासाठी केली जाणारी उधळपट्टी थांबवायला हवी. यापेक्षा लग्नावर खर्च  केले जाणारे लाखो रुपये वधू-वरांसाठी भविष्याची तरतूद म्हणून ठेवल्यास त्याचा उपयोग होईल व संकटाच्या काळातही दिलासा मिळेल. या निर्णयाचे मी स्वागत करतो आणि योग्य ती दक्षता घेऊनच मुलीचा विवाह केला जाईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कात्रज येथील माऊली मंगल कार्यालयाचे संचालक शुभम कदम म्हणाले, "वीस लोकांनाच लग्नासाठी परवानगी असल्याने आता लोक मंगल कार्यालयांकडे येणारच नाहीत. मंगल कार्यालयांना ही एवढ्या कमी लोकांची व्यवस्था करणे परवडणार नाही. मात्र महापालिकेने केलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून वीस लोकांमध्ये पूर्व नियोजित विवाह पार पाडले जातील. पुढील महिन्यात या नियमांमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे."

(Edited By : Krupadan Awale)

loading image