
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आत्तापर्यंत केवळ ३८० हरकती आलेल्या आहेत. बहुतांश हरकती या खराडी आणि सिंहगड रस्त्यांवरील प्रभागांमधील आहेत.
खराडी येथील थिटे वस्तीतील तब्बल १३० नागरिकांनी एक सारखीच हरकत दाखल केली आहे. दरम्यान गणेशोत्सव सुरु असल्याने बहुतांश राजकीय कार्यकर्ते त्यात व्यस्त असल्याने हरकती कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.