esakal | पुण्यात सायकलट्रॅकचा वापर नगण्यच; 82 टक्के सायकलस्वारांची पाठ 
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात सायकलट्रॅकचा वापर नगण्यच; 82 टक्के सायकलस्वारांची पाठ 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यायामासाठी सायकल चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. सकाळी 6 ते 8 दरम्यान हे प्रमाण जास्त आहे. या कालावधीत सायकलस्वार ट्रॅकऐवजी प्रामुख्याने रस्त्याचा वापर करतात.

पुण्यात सायकलट्रॅकचा वापर नगण्यच; 82 टक्के सायकलस्वारांची पाठ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात गाजावाजा करीत महापालिकेने निर्माण केलेल्या सायकल ट्रॅकचा वापर अवघे 8 ते 18 टक्केच सायकलचालक करीत असल्याच्या "सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट'च्या (एसपीटीएम) सर्वेक्षणात नुकतेच आढळले आहे. सुमारे 82 टक्के चालक रस्त्यांवरूनच सायकल चालवीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यायामासाठी सायकल चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. सकाळी 6 ते 8 दरम्यान हे प्रमाण जास्त आहे. या कालावधीत सायकलस्वार ट्रॅकऐवजी प्रामुख्याने रस्त्याचा वापर करतात. यापार्श्‍वभूमीवर कोथरूड, कर्वेनगर, जंगली महाराज, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथील सहा ठिकाणच्या सायकल ट्रॅकचे "एसपीटीएम'च्या कार्यकर्त्यांनी ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर दरम्यान 14 दिवस सर्वेक्षण केले. त्यासाठी सकाळी 9.30 ते 11. 30, दुपारी 1 ते 4 आणि सायंकाळी 5 ते 7 ही वेळ निवडण्यात आली होती. या कालावधीत सायकलस्वारांपैकी कितीजण सायकल ट्रॅकचा वापर करतात आणि कितीजण रस्त्यांचा वापर करतात, याची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली. त्यातून सहा ठिकाणी 8 ते 18 टक्के सायकलस्वार सायकल ट्रॅकचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूड, कर्वेनगरमधील सायकल ट्रॅकचा वापर तुलनेने अधिक होतो, हेही सर्वेक्षणात आढळले. रुंद झालेल्या पदपथांवरही अतिक्रमणे होत असल्यामुळे नागरिक सायकल ट्रॅकवरूनच चालतात, असेही "एसपीटीएम'ला दिसून आले आहे. 

- शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेतंर्गत (जेएनएनयुआरएम) 2014 पूर्वी सुमारे 90 किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅकचे काम पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा 
- प्रत्यक्षात त्यांच्यात सलगता नसणे, हे त्यांचा वापर न होण्यामागचे प्रमुख कारण. 
- गेल्या तीन वर्षांत शहरात 25 किलोमीटर सायकल ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्यातही सलगता नाही. 
- सायकल ट्रॅक रस्त्याला समतल असल्यास त्याचा वापर होण्याची शक्‍यता जास्त असल्याचे "एसपीटीएम'ने महापालिकेला सुचविले. 
- नव्याने करण्यात येत असलेल्या रस्त्यांवर बोलार्डची संख्या जास्त आहे. त्याचा सायकलस्वारांना अडथळा. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायकल चालविणाऱ्या नागरिकांची संख्या वाढती आहे. मात्र, त्यांच्यासाठी सलग सायकल ट्रॅक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच असलेल्या सायकल ट्रॅकमध्ये पुरेशा सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. 
हर्षद अभ्यंकर, एसपीटीएम 

loading image