पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

पुणे शहराला दोन महिने पुरेल इतकेच पाणी

पुणे, ता. १५ : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून एकूण ६.७० टीएमसी म्हणजे २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २.३० टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. शहराला दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षी सरसरीपेक्षा कमी पावसामुळे पानशेत, खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणे कशीबशी १०० टक्के भरली. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने धरणात पुन्हा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा होता. सद्यःस्थितीत टेमघर धरणे रिकामे झाले असून, धरणात अवघे ४.९९ टक्के म्हणजेच ०.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात नऊ टीएमसी म्हणजेच ३०.८७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा प्रकल्पात ६.७० टीएमसी म्हणजे २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

आतापासूनच नियोजन करण्याची गरज
पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा खडकवासला प्रकल्पात राखीव ठेवला आहे, असा दावा पाटबंधारे आणि महापालिका प्रशासनाकडून सुरुवातीपासूनच करण्यात येत आहे. मात्र मागील काही वर्षांपासूनचा पावसाचा अंदाज पाहता मॉन्सूनचे वेळेवर आगमन होते. मात्र, त्यानंतर पाऊस लांबणीवर पडतो. त्यामुळे शहरासमोर पाणीकपातीचे संकट उभे राहत आहे. त्यामुळे पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

धरणाचे नाव उपलब्ध पाणीसाठा (टीएमसीत) टक्केवारी
खडकवासला १.२१ ६१.५१
पानशेत २.०२ १८.९९
वरसगाव ३.२८ २५.५८
टेमघर ०.१९ ४.९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com