Coronavirus
CoronavirusSakal

केवळ एक टक्का कोरोना बाधितांमुळे पुणे गेले तिसऱ्या स्तरात

शहरातील ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरी, कोरोना बाधितांचे प्रमाण ६.११ टक्के इतके असल्याचा फटका पुण्याला बसला आहे.

पुणे - शहरातील ऑक्सिजन बेडवर (Oxygen Bed) उपचार (Treatment) घेणाऱ्या रुग्णांची (Patient) संख्या कमी असली तरी, कोरोना बाधितांचे प्रमाण ६.११ टक्के इतके असल्याचा फटका पुण्याला (Pune) बसला आहे. शासनाच्या नियमावलीनुसार तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये पुण्याचा समावेश झाला. बाधितांचे प्रमाण पाच टक्केपेक्षा कमी असते तर दुसऱ्या स्तरात समावेश होऊन निर्बंध जवळपास संपले असते. (Only One Percent of Corona Sufferers Went to Pune Third Step)

शहरातील कोरोना बाधितांचे प्रमाण शासनाच्या निकषांपेक्षा १.१ टक्के जास्त असल्याने निर्बंध आले आहेत. जर प्रमाण पाच टक्केपेक्षा कमी असते तर दुकाने दिवसभर खुली ठेवण्यास परवानगी मिळाली असती. तसेच नाट्यगृहे, मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू झाली असती. खासगी व शासकीय कार्यालये, सार्वजिनक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करता आली असती. मात्र, आता तिसऱ्या स्तरात पुण्याचा समावेश असल्याने बंधने आली आहेत.

Coronavirus
कसं काय ठीक आहे का? मावळच्या शेतकऱ्याशी मोदींचा मराठीत संवाद

शासनाच्या निकषानुसार पहिल्या स्तरात बाधितांचे प्रमाण ५ टक्के व ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के पेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. दुसऱ्या स्तरात बाधितांचे प्रमाण ५ टक्के पेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेडचे प्रमाण २५ ते ४० टक्के या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. तर तिसऱ्या स्तरात बाधितांचे प्रमाण ५ ते १० टक्के आणि ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्याचे प्रमाण ४० पेक्षा जास्त असेल असे नमूद केले आहे. पुण्यातील ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे २७.४७ टक्के हे दुसऱ्या स्तरासाठी लागू होते. पण कोरोना बाधितांचे प्रमाण ६.११ असल्याने शहराचा समावेश तिसऱ्या स्तरात झाला आहे. पुढील आठवड्यात पुण्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण ५ टक्केपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्बंध शिथिल होतील, असे आरोग्य विभागातील अधिकार्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com