

Pune Garbage
sakal
पुणे - शहरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने २०० टन सुका व ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संयुक्त निविदा काढली होती. त्यात केवळ दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे. पुरेशी स्पर्धा न झाल्याने यात महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार की फायदा याकडे लक्ष लागले आहे.