Pune News : पुणे महापालिकेसमोर ‘खुले बार’; मद्यापींचा उपद्रव, स्थानिक रहिवासी त्रस्त

महापालिकेच्या प्रवेशव्दारावर एका वाईन शॅाप मधून मद्य खरेदी करून, मद्यपी तिथेच पदपथावर मद्यपान करत असल्याने पादचारी व स्थानिक रहिवाशांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
Alcohol Drinker
Alcohol Drinkersakal
Updated on

शिवाजीनगर - महापालिकेच्या प्रवेशव्दारावर एका वाईन शॅाप मधून मद्य खरेदी करून, मद्यपी तिथेच पदपथावर मद्यपान करत असल्याने पादचारी व स्थानिक रहिवाशांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाईनशॅापमध्ये केवळ मद्यविक्रीला परवानगी आहे.

मात्र, त्याच ठिकाणी रिकामे ग्लास, खाद्यपदार्थाची विक्री केले जाते. वाईनशॅापबाहेर, परिसरात मद्यापान केल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करणे अपेक्षित असताना, याकडे डोळेझाक होत आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जागोजागी मद्यपान करायला मद्यापी बसतात.

याच ठिकाणी मद्यापींची भूक भागविण्यासाठी खाद्यपदार्थ देखील जवळच मिळत आहेत. महापालिकेच्या प्रवेशव्दारावरच खुलेआम हा प्रकार सुरू असल्याने याबाबत, पोलिस कारवाई होत नसल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, महानगरपालिका, शहर पोलिसांनी यावरती कारवाई करणे अवश्यक असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.

वाईन शॅाप, बार याठिकाणी सऱ्हासपणे नियंमांचे उल्लंघन केले जाते. वाईन शॅापमधून फक्त मद्य विेक्रीला परवागी आहे मात्र, त्याठिकाणी इतरही पदार्थ विक्री केले जातात. रस्त्यावर दररोज सकाळी मद्यापन करून राहिलेल्या बाटल्याचे खच पडलेले असतात. वाईन शॅाप वाल्यांना इतकी सुटका का दिली जाते. पदपथावर मद्यपान करायला नागरिक बसतात त्यामुळे रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते.

- रणजित शिरोळे, शिवाजीनगर

येथील रस्ता आणि पदपथावरून जाताना घाण वास येतो व संध्याकाळच्या वेळेस तेथून फिरताना असुरक्षितता वाटते.

- स्थानिक महिला रहिवासी, शिवाजीनगर गावठाण

नियमित कारवाई चालूच असते, यापुढेही कारवाई केली जाईल.

- चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीनगर पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com