माझा प्रभाव माझे व्हिजन: शैक्षणिक  व मूलभूत सुविधा पुरविणे हेच माझे ध्येय: नगरसेविका अनिता ढवळे

माझा प्रभाव माझे व्हिजन: शैक्षणिक व मूलभूत सुविधा पुरविणे हेच माझे ध्येय: नगरसेविका अनिता ढवळे

Published on

PDR26B09458

ओपन स्पेसचा चांगल्या पद्धतीने विकास करणार

पंढरपूर ः इसबावी प्रभाग क्रमांक ११ हा पंढरपूर नगरपालिकेचा हद्दवाढ भाग असून सर्वाधिक वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. प्रभाग क्रमांक ११ हे पंढरपूरचे प्रवेशद्वार असून याच पुणे ते पंढरपूर मार्गाने संतांच्या पालख्या पंढरपुरात प्रवेश करतात. त्यामुळे नागरी सुविधांनी परिपूर्ण असा प्रभाग करणे हेच माझे प्राधान्याने ध्येय आहे. सर्वांना मुबलक पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते, पुरेशी रोडलाईटची व्यवस्था, स्मशानभूमी, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोय, ओपन स्पेसचा विकास करणे, त्याचबरोबर विविध प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देणे, स्वच्छ- सुरक्षित- हरित - प्रगत -साक्षर प्रभाग करणे हेच माझे व्हीजन आहे. ओपन स्पेसवर चांगल्या पद्धतीने सुविधा देऊन उद्यान तयार करणे व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यास माझे प्राधान्य असेल. प्रभागातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने व्हीजन पूर्ण करण्यासाठी सदैव मी तत्पर राहीन.
अनिता सिकंदर ढवळे, नगरसेविका, नगरपरिषद पंढरपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com