चिंचवड स्टेशनजवळील मदर तेरेसा उड्डाण पुलाच्या रॅम्पचे अखेर उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

चिंचवड स्टेशनजवळील एम्पायर इस्टेट वसाहतीमध्ये उभारलेल्या मदर तेरेसा उड्डाण पुलाच्या रॅम्पचे उद्‌घाटन अखेर महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री अजित पवार यांचे नाव पत्रिकेत न छापताच उद्‌घाटन करण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी नाराजी व्यक्त केली.

पिंपरी - चिंचवड स्टेशनजवळील एम्पायर इस्टेट वसाहतीमध्ये उभारलेल्या मदर तेरेसा उड्डाण पुलाच्या रॅम्पचे उद्‌घाटन अखेर महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री अजित पवार यांचे नाव पत्रिकेत न छापताच उद्‌घाटन करण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या रॅम्पमुळे चिंचवड स्टेशनमार्गे काळेवाडी, वाकड, हिंजवडीकडे जाणाऱ्या तसेच तेथून चिंचवड स्टेशनकडे येणाऱ्या वाहनचालकांची सोय झाली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेवक शैलेश मोरे उपस्थित होते. सुमारे आठ कोटी रुपये खर्चून हा रॅम्प बांधण्यात आला आहे. ऑक्‍टोबर २०१९ मध्येच रॅम्प सुरू होणे अपेक्षित होते. कामाची मुदत संपूनही काम पूर्ण न झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून रॅम्पच्या परिसरात रंगरंगोटी, रस्त्याचे डांबरीकरण आदी कामे सुरू होती. उद्‌घाटन झाले तरी पादचाऱ्यांसाठी उभारलेल्या जिन्याचे काम पूर्ण झाले नव्हते.

ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण न करताच रॅम्पचे उद्‌घाटन कसे काय करण्यात आले, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. अजित पवार यांचे नाव न छापल्याबाबत महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ‘‘निमंत्रणपत्रिकेत पालकमंत्री अजित पवार यांचे नाव न छापण्याची चूक जनसंपर्क विभागाची आहे. मला याबाबत माहिती नाही. यावरून राजकारण होत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The opening of the ramp to the Mother Teresa over bridge