
पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय खतीजा शहाबुद्दीन शेख या तरुणीने इन्स्टाग्रामवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, तर सिंहगड महाविद्यालयातून काढून टाकले. आता या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेत महाविद्यालयाची कारवाई रद्द करण्याची आणि सत्र परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली आहे.