"डिजिटल'मुळे मिळाला व्यवसायाला "स्टेट'स;छोट्या नव व्यावसायिकांसाठी संधी

"डिजिटल'मुळे मिळाला व्यवसायाला "स्टेट'स;छोट्या नव व्यावसायिकांसाठी संधी

पुणे - कोरोनामुळे नोकरी गेली; मात्र मी घरातूनच अत्यावश्‍यक वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाउनमुळे सुरुवातीला ग्राहक मिळणे कठीण झाल्याने मी डिजिटल मीडियाचा वापर सुरू केला आणि त्यातून माझ्या व्यवसायाला चालना मिळाली. आता हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढतोय...निशिका मारणे सांगत होती. यासाठी सोशल मीडियाच्या "स्टेटस'चा मोठा फायदा झाल्याचेही त्या सांगत होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवनवीन खाद्यपदार्थ असो किंवा भटकंती करतानाचे फोटो. आपले मित्र-मैत्रीण कुठे-काय करताहेत? याचे अपडेट आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसवरून हमखास समजायचे; मात्र कोरोना आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाउनमुळे या स्टेटसचे स्वरूपच बदलून गेले. सध्या या फोटो, व्हिडिओंची जागा वेगवेगळ्या ब्रॅंड आणि "प्रॉडक्‍ट'नी घेतली आहे. नव व्यावसायिकांच्या फेसबुक, व्हाट्‌सऍप, इन्स्टाग्रामवर सहज नजर मारल्यास स्टेटसला ते विक्री करत असलेल्या उत्पादनांचे फोटो दिसत आहेत. अशाच प्रकारे व्यवसाय करणाऱ्या ईला परमार यांनी याबाबत सांगितले की, "मी गृहिणी आहे. व्यवसाय सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती; मात्र त्याला लागणारे भांडवल व त्यातून उत्पन्न येईल का? याची खात्री नसल्याने टाळत होते. लॉकडाउनमुळे मात्र व्यवसायाला मुहूर्त मिळाला. मी घरून साड्या विकते. विक्री वाढावी म्हणून त्यांचे फोटो सतत सोशल मीडियावर टाकत असते. व्हॉट्‌सऍपवर काही ग्रुपदेखील तयार केले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरगुती व्यावसायिका शिल्पा मोरे म्हणाल्या की "सुरुवातीला व्यवसाय चालेल की नाही, याबाबत साशंकता होती. सोशल मीडियावरील व्यवसायाला खर्च कमी असतो. त्यामुळे व्यवसायातून कमी उत्पन्न किंवा विक्री झाली नाही जास्त परिणाम होत नाही. सध्या सोशल मीडिया स्टेटस आणि व्हॉट्‌सऍप ग्रुपवर चांगला प्रतिसाद मिळतोय.' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विनाखर्च जाहिरात 
घरगुती व्यवसायिकांकडे भांडवल कमी असते. त्यामुळे व्यवसायवाढीसाठी लागणारा जाहिरात खर्च त्यांना परवडणारा नसतो. अशावेळी डिजिटल मीडिया आणि ओळखीचे लोक हेच त्यांच्यासाठी जाहिरातीचे माध्यम बनतात. त्याचा पुरेपूर वापर ते व्यवसायवाढीसाठी करत असल्याचे दिसते. अशा प्रकारे जाहिरात करणाऱ्यांमध्ये महिला व्यावसायिकांचे प्रमाण जास्त आहे. 

"सकाळ'ने आणलीय सुवर्णसंधी 
घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी "सकाळ' आणि "बल्ब अँड की' ने आणलीय सुवर्णसंधी. आता आपल्या व्यवसायाला डिजिटल करा. आपले प्रोडक्‍ट सकाळच्या येणाऱ्या प्लॅटफॉर्मवर लिस्ट करा. स्वतःच प्रोफाइल, प्रोडक्‍ट ग्राहकांना दाखविण्याची, विक्री आणि डिलिव्हरीची सुविधा मिळवा. 
अधिक माहितीसाठी 
संपर्क ः 917972711710, 917028794743 
ईमेल ः 3km.india@gmail.com 

"बल्ब अँड की'मुळे माझ्या व्यवसायाला चांगले व्यासपीठ मिळाले आहे. आता व्यवयासाची व्याप्ती वाढली असून, व्यवहार अगदी सोपे झाले आहेत. "बल्ब अँड की'मुळे ऑडर्र, डिलिव्हरी आणि वस्तूंच्या पैशांची चिंता मिटली आहे. 
- आश्‍लेषा पाठक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com